Today gold, silver rate : सोन्याच्या दरात चमक, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

सोन्यातील घसरणीला ब्रेक लागला असून, आज सोन्या-चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. जाणून घेऊयात प्रमुख शहरातील भाव

Today gold, silver rate : सोन्याच्या दरात चमक, चांदीही वधारली; जाणून घ्या आपल्या शहरातील दर
आजचे सोन्याचे दर
| Updated on: Jun 02, 2022 | 2:55 PM

मुंबई : बुधवारी सोने (Gold) आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. मात्र आज या घसरणीला ब्रेक लागला आहे. आज पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार आज 22 कॅरट सोन्याचे दर (Gold Rates) प्रति तोळा 47,600 रुपये इतके आहेत. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,930 रुपये एवढे आहेत. बुधवारी 22 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 47,500 रुपये एवढे होते. तर 24 कॅरट सोन्याचे दर प्रति तोळा 51,820 रुपये एवढे होते. आज 22 आणि 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे अनुक्रमे 100 व 110 रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे आज चांदी देखील वधारली असून, आज चांदीच्या दरात (Silver Rates) किलोमागे 800 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी एक किलो चांदीचा दर 60,600 रुपये इतका होता. तर आज एक किलो चांदीचा दर 61,400 रुपयांवर पोहोचला आहे. सोन्याचे दर दिवसातून दोन जाहीर केले जातात. एक सकाळी सराफा मार्केट सुरू झाल्यानंतर आणि दुसऱ्यांदा सायंकाळच्या वेळी त्यामुळे सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

आज जारी करण्यात आलेल्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,600 रुपये इतका आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,930 रुपये इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,700 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,030 रुपये इतका आहे. पुण्यात 22 व 24 कॅरट सोन्याचा दर अनुक्रमे 47,700 आणि 52,030 रुपये प्रति तोळा इतका आहे. नाशिकमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,700 रुपये इतका आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,030 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47660 रुपये असून, 24 कॅरट सोन्यासाठी 52 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

प्रमुख महानगरातील भाव

आज राजधानी दिल्लीमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,600 रुपये एवढा आहे. तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,930 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,600 रुपये असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,930 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,750 रुपये इतका आहे तर 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 52,100 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये 22 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 47,600 रुपये इतका असून, 24 कॅरट सोन्याचा दर प्रति तोळा 51,930 रुपये इतका आहे. तर आज चांदीचा दर प्रति किलो 61,400 रुपये इतका आहे.