AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँक खात्यात नॉमिनीचं नाव आहे, पण त्याचाही मृत्यू झाला तर… मग पैसे कोणाला मिळतात? RBI चा नियम काय सांगतो?

बँक खातेधारक आणि नॉमिनी या दोघांचाही मृत्यू झाल्यास बँक खात्यातील पैशांचे काय होते? वारसा हक्क, आरबीआयचे नियम आणि उत्तराधिकार प्रमाणपत्राचे महत्त्व याबद्दलची सविस्तर माहिती वाचा.

बँक खात्यात नॉमिनीचं नाव आहे, पण त्याचाही मृत्यू झाला तर... मग पैसे कोणाला मिळतात? RBI चा नियम काय सांगतो?
bank account nominee
| Updated on: Apr 29, 2026 | 1:48 PM
Share

बँकेत खाते उघडताना आपण नॉमिनी किंवा वारसदार म्हणून कोणाचे तरी नाव देतो. अनेकांना वाटते की नॉमिनी असणे म्हणजे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, जर दुर्दैवाने खातेधारक आणि नॉमिनी या दोघांचाही मृत्यू झाला तर मग त्या पैशांचे काय होते? असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? हे पैसे नक्की कोणाला मिळतात आणि त्यासाठी कोणती प्रक्रिया पार पाडावी लागते? यासाठी रिर्झव्ह बँक ऑफ इंडियाचे नियम आणि कायदेशीर तरतुदी काय सांगतात, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नॉमिनी म्हणजे मालक नव्हे

१९८४ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या एका ऐतिहासिक निकालानुसार, नॉमिनी ही व्यक्ती केवळ त्या रकमेची विश्वस्त (Trustee) असते. मालक नाही. नॉमिनीचे काम केवळ बँकेकडून पैसे ताब्यात घेणे आणि ते मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांपर्यंत पोहोचवणे इतकेच असते. जर नॉमिनीचा मृत्यू झाला असेल, तर बँक खात्यातील पैशांवर हक्क सांगण्याचा अधिकार थेट कायदेशीर वारसांना मिळतो.

मृत्युपत्राचा कायदा

जर खातेधारकाने मृत्यूपूर्वी मृत्युपत्र केले असेल, तर त्यातील तरतुदींनुसार मालमत्तेचे वाटप केले जाते. परंतु, जर मृत्युपत्र नसेल, तर त्या व्यक्तीच्या धर्माच्या वैयक्तिक कायद्यानुसार (उदा. हिंदू उत्तराधिकार कायदा) वारसांची निवड केली जाते. अशा परिस्थितीत, बँकेकडून पैसे मिळवण्यासाठी सक्सेशन सर्टिफिकेट (Succession Certificate) किंवा उत्तराधिकार प्रमाणपत्र सादर करणे सर्वात महत्त्वाचे ठरते.

Joint Account बाबतीत नियम काय?

संयुक्त खात्याच्या बाबतीत प्रक्रिया थोडी सोपी असते. जर Either or Survivor मोडवर खाते असेल आणि एका खातेधारकाचा मृत्यू झाला, तर जिवंत असलेला दुसरा खातेधारक केवळ मृत्यू प्रमाणपत्र सादर करून खाते चालू ठेवू शकतो. तसेच त्यातील रक्कम काढू शकतो.

१० वर्षांनंतर पैशांचे काय होते?

जर कोणत्याही खात्यावर सलग १० वर्षे कोणीही दावा केला नाही, तर आरबीआय ती रक्कम अनक्लेम्ड डिपॉझिट (Unclaimed Deposit) म्हणून घोषित करते. ही रक्कम ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता (DEAF) निधीकडे ट्रान्सफर केली जाते. याचा अर्थ असा नाही की ते पैसे बुडाले. कायदेशीर वारस योग्य कागदपत्रे आणि पुरावे सादर करून ही रक्कम कधीही परत मिळवण्यासाठी अर्ज करू शकतात.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत