कंपनीच्या प्रगतीमध्ये व्यवस्थापनाची काय भूमिका असते; व्यवस्थापन बदलल्यास गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी?

| Updated on: May 24, 2022 | 5:30 AM

एखाद्या कंपनीचे मॅनेजमेंट बदलल्यास त्या कंपनीच्या शेअर्सला देखील मोठा फटका बसू शकतो. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी काय काळजी घ्यावी हे आज आपण जाणून घेऊयात

कंपनीच्या प्रगतीमध्ये व्यवस्थापनाची काय भूमिका असते; व्यवस्थापन बदलल्यास गुंतवणूकदारांनी कोणती काळजी घ्यावी?
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : निखिल वर्तमानपत्र वाचत असताना दोन बातम्या वाचून गोंधळात पडला. एका बातमी ‘Jubilant Food Works’चे सीईओ प्रतीक पोटा (Prateek Pota) यांच्या राजीनाम्याची होती. पोटा यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये 12 टक्क्यानं घसरण झाली. दुसरी बातमी होती इंडिया बुल्सची (India Bulls), समीर गेहलोत यांच्या राजीनाम्यानंतर इंडिया बुल्सच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांनी वाढ झाली. अशाच प्रकारे एचडीएफसी बँकेचे (HDFC Bank) सीईओ आदित्य पुरी यांच्या निवृत्तीनंतर शेअर्समध्ये घसरण झालीये. निखिल शेअर बाजारात गुंतवणूक करतो आणि नेहमी शेअरच्या संदर्भात नवीन माहिती, गोष्टी शिकत असतो. एकाच परिस्थितीत शेअर्सची प्रतिक्रिया वेगळी का असते याबाबत उत्तर शोधण्याचं त्याने ठरवलं. व्यवस्थापनातील बदलामुळे शेअर्सवर परिणाम होतो याची माहिती बरंच संशोधन केल्यानंतर निखिलला मिळाली. आधीपेक्षा सध्या हा फरक जास्त पडत आहे.

7.5 टक्के निगेटिव्ह रिटर्न

निखिलने सुरुवातीला एचडीएफसी बँकेची पडताळणी केली. एचडीएफसी बँकेनं आतापर्यंत गुंतवणूकदारांना 21,916 टक्के रिटर्न दिलाय. एक जुलाई 1999 पासून साडेपाच रुपयांपासून वाढून 26 ऑक्टोबर 2020 पर्यंत बँकेचे शेअर्स 1,210.90 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. 26 ऑक्टोबर 2021 रोजी एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ आदित्य पुरी निवृत्त झाले. एचडीएफसी बँकेला देशातील नबंर एकची खासगी बँक करण्यासाठी पुरी यांनी जवळपास 25 वर्षांचा कालावधी घालावला. गेल्या पाच वर्षांत बँक वार्षिक 20 टक्के दरानं वाढत होती. मात्र पुरी यांनी राजीनामा देताच एचडीएफसीच्या शेअर्समधील चमक संपली. त्यात मोठी घसरण झाली नाही, मात्र बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत कामगिरी घसरली आहे. गेल्या एका वर्षात बँकेनं 7.5 टक्के निगेटिव्ह रिटर्न दिलाय. दुसरीकडे निफ्टीमध्ये देखील घसरण झाली आहे. एखाद्या कंपनीच्या व्यवस्थापनातील एखादा कर्मचारी कंपनी सोडून जात असेल तर अशा बातम्यांकडे लक्ष दिलं पाहिजे आणि सावधगिरी बाळगली पाहिजे, असं मत स्वास्तिका इनवेस्टमेंट मार्केटचे संशोधक संतोष मीणा यांनी व्यक्त केले आहे.

व्यवस्थापनाचे ध्येय, धोरण समजून घ्या

एखाद्या कंपनीची यशस्वीता व्यवस्थापनाचं कार्य आणि धोरणावर अवलंबून असते. चांगलं व्यवस्थापन कंपनीला यशस्वी करते. मात्र, स्टार मॅनेजर्सची संख्या कमी आहे. अशावेळी मॅनेजरने कंपनी सोडल्यास कंपनीच्या भविष्यातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स खाली पडतात. उदाहरणार्थ एचडीएफसी बँकेचे आदित्य पुरी सोडून गेल्यानंतर शेअर्समध्ये मोठी घसरण झालीये. अद्यापही नव्या व्यवस्थापनाला त्यांचं कौशल्य सिद्ध करता आलेलं नाही. तुम्ही जर एखाद्या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवले असतील तर त्या कंपनीच्या व्यवस्थापनात होणाऱ्या हालचालींकडे देखील लक्ष देणे आवश्यक ठरते. नव्या व्यवस्थापनाचं ध्येय आणि धोरणं समजून घेतले पाहिजेत. कारण त्यावरच कंपनीची पुढची वाटचाल ठरणार असते.

हे सुद्धा वाचा