AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टॉपअप लोन म्हणजे कायरे भाऊ? टॉपअप कर्ज घेताना काय काळजी घ्यावी

फायनान्स कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चांगले ग्राहक शोधत असतात. वेळेत कर्जाचा हप्ता भरणारे बँकेचे जुने ग्राहक तसेच ज्यांचा सीबील स्कोअर चांगला असतो अशा ग्राहकांना त्यांचा जुना रेकॉर्ड पाहून अतिरिक्त लोन देण्यासाठी ऑफर देण्यात येते.यालाच टॉपअप लोन म्हणतात.

टॉपअप लोन म्हणजे कायरे भाऊ? टॉपअप कर्ज घेताना काय काळजी घ्यावी
| Updated on: Sep 12, 2022 | 4:16 PM
Share

खासगी कंपनीत काम करणाऱ्या सुरेश मोरे यांना आपल्या मुलीची फीस (fee) भरण्यासाठी तीन लाख रुपयांची गरज आहे. परंतु हे महाविद्यालय बँकेच्या लिस्टमध्ये नसल्याने शैक्षणिक कर्ज (Education loan) मिळत नाहीये. त्यामुळे मोरे चिंतेत आहेत. त्यावेळी त्यांच्या एका मित्राने टॉपअप लोन घेण्याचा सल्ला दिला. टॉपअप लोन (Topup Loan) म्हणजे काय, कधी आणि कसे घेता येते याबद्दल मात्र सुरेश यांना कोणतीही कल्पना नाही. तुम्हाला देखील याबद्दल काही माहीत नसेल तर आता आपण त्याबद्दल जाणून घेऊयात.बँका आणि फायनान्स कंपन्या आपला व्यवसाय वाढवण्यासाठी चांगले ग्राहक शोधत असतात. वेळेत कर्जाचा हप्ता भरणारे बँकेचे जुने ग्राहक तसेच त्यांचा सीबील स्कोअर चांगला असतो अशा ग्राहकांना त्यांचा जुना रेकॉर्ड पाहून अतिरिक्त लोन देण्यासाठी ऑफर देण्यात येते.यालाच टॉपअप लोन म्हणतात.सध्या बँका मालमत्ता कर्ज आणि वैयक्तिक कर्जावर टॉपअप लोन देतात. अशा ग्राहकांना बँकांमार्फत टॉपअप लोनसाठी फोन, मेसेज आणि मेल्स येत राहतात.

टॉपअप लोन कधी घ्यावे?

टॉपअप लोन कधी घ्यावे तसेच त्याचे फायदे कोणते आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. कर्ज घेऊन तूप खाण्यात कोणताही शहाणपणा नाही. जर मुलांचे लग्न, शिक्षण, व्यवसाय किंवा आजारपणासाठी जास्त पैशांची गरज असते तेव्हाच टॉपअप लोन घेणे फायद्याचे ठरते.फिरण्यासाठी किंवा लक्झरी वस्तू खरेदी करण्यासाठी टॉप अप लोन घेतल्यास मुर्खपणा ठरतो. टॉपअप लोन घ्यायचे असल्यास गृहकर्जावर घेण्याचा विचार करावा. हा पर्याय नसल्यास मालमत्तेच्या कर्जावर टॉपअप लोन घेऊ शकता. वैयक्तिक कर्जावर टॉपअप लोन हा शेवटचा पर्याय ठेवावा. याचे कारण म्हणजे वैयक्तिक लोन हे इतर कर्जापेक्षा अधिक महाग असते.

टॉपअप लोन कशाच्या आधारे मिळते?

सहसा टॉपअप लोन मंजूर करताना बँक ग्राहकाचा मागील सहा महिन्यांचा रेकॉर्ड चेक करतात. टॉपअप लोन मंजुरीसाठी ही सर्वात मोठी अट आहे. त्यानंतर बँक ग्राहकांच्या अतिरिक्त लोनच्या परतफेडीचं आकलन करते. तुमची टॉप अप लोन परतफेडीची क्षमता चांगली असल्यास बँक कर्ज मंजूर करते. कर्जफेडीची क्षमता तपासण्यासाठी बँका तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि मासिक उत्पन्न आणि खर्चाचं आकलन करतात. टॉपअप लोन जुन्या कर्जाच्या तुलनेत 3 ते 4 टक्के महाग असते. मुख्य बँका गृहकर्जाच्या टॉपअप वर 7.5 ते 9.30 टक्के इतके व्याज आकारतात.

बँकांच्या धोरणावर टॉप अप लोन किती मिळणार हे अवलंबून असतं. गृहकर्ज ज्या बँकेच्या शाखेतून घेतलंय त्याच शाखेत टॉपअप कर्जासाठी अर्ज करता येतो. बँक घराच्या बाजार मूल्यानुसार टॉप अप लोन मंजूर करतात. म्हणजेच तुमच्या घराचे बाजारमूल्य 50 लाख रुपये असेल तर 80 टक्के प्रमाणे बँक 40 लाख रुपयांचे गृहकर्ज मंजूर करते.जर तुम्ही 25 लाखांचे गृहकर्ज घेतले असल्यास 15 लाख रुपयांचं टॉपअप लोन मिळतं. ग्राहकाची सर्व माहिती बँकेला असते त्यामुळे लवकर कर्ज मंजूर होते. तसेच टॉपअप लोन घेण्याची प्रक्रिया देखील सोपी असते.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.