Home loan डिफॉल्ट झालंय? चिंता करू नका, ‘असे’ फेडा आपल्या घराचे हप्ते

| Updated on: Mar 20, 2022 | 7:34 AM

जर तुम्ही होमलोन (Home loan) घेतले असेल आणि ते डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर असेल किंवा झाले असेल तर काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो.

Home loan डिफॉल्ट झालंय? चिंता करू नका, असे फेडा आपल्या घराचे हप्ते
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

जर तुम्ही होमलोन (Home loan) घेतले असेल आणि ते डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर असेल किंवा झाले असेल तर काय करावे असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्येकाला आपलं हक्काचं घर असावं असं वाटतं. त्यासाठी अनेक जण होम लोन काढतात. मात्र घर खरेदी केल्यानंतर भविष्यात अनअपेक्षित काही अडचणी समोर उभ्या राहातात. जसे की आजारपण, अचानक जॉब जाने, व्यवसायात झालेला तोटा. अशावेळी होमलोनचे हफ्ते नियमित भरणं शक्य होत नाही आणि होमलोन डिफॉल्ट (Home loan default) होते. कर्जाचे हप्ते (Home loan EMI) वेळेत न भरल्यामुळे तुमचे लोन डिफॉल्ट होते. होमलोन डिफॉल्ट झाल्यास चिंता करण्याचे कारण नाही. मात्र तुम्ही घेतलेले कर्ज कोणत्याही परिस्थितीमध्ये बँकेला परत करा असा सल्ला तज्ज्ञ देतात. तुम्ही जर एखाद्या बँकेकडून होमलोन घेतले असेल आणि ते जर तुम्ही परत करू शकला नाहीत, तर तुम्हाला भविष्यात इतर कुठलेही लोन मिळत नाही, सोबतच बँकेकडून तुमच्या घरावर जप्ती अणली जाते. जर आपले गृहकर्ज डिफॉल्ट होण्याच्या मार्गावर असेल तर ते आपण कोणत्या मार्गाने फेडू शकतो, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

एफडी तोडून कर्जाचा हप्ता भरा

अनेक जण बचत करत असतात. बचत केलेल्या पैशांची बँकेत किंवा पोस्टात एफडी केलेली असते. संकट काळात आपल्याला आपण बचत केलेला पैसा उपयोगी पडावा म्हणूनच ही एफडीची योजना असते. आता घरावर जप्ती येण्याचे संकट निर्माण झाल्यास तुम्ही ही एफडी तोडून देखील बँकेचे हप्ते भरू शकता. असे केल्यास तुम्हाला कर्जाची रक्कम जमा करण्यास वेळ मिळेल व तुमचे घर देखील सुरक्षीत राहील.

पर्सनल लोन घेऊ शकता

जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला कोणतीही बँक पर्सनल लोन देते. तुम्ही पर्सनल लोन घेऊन देखील तुमच्या घराचा थकीत इएमआय भरू शकता. त्यानंतर जेव्हा तुमची आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा तुम्ही पर्सनल लोनची परतफेड करू शकता.

घर विकू शकता

जर तुमचे होम लोन डिफॉल्ट झाले आणि तुम्हाला कर्जाचा हप्ता भरण्यासाठी कुठूनच पैशांची सोय होणार नसेल तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुमचे घर देखील विकू शकता. तुमच्या घरावर बँकेने जप्ती आणली आणि घराचा लिलाव केला तर कदाचित तुम्हाला त्या घराची म्हणावी तेवढी किंमत मिळणार नाही. मात्र तुम्ही जर स्वत: घर विकले तर तुम्हाला त्याची चांगली किंमत मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्याकडे हा देखील एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या

गुंतवणूकदारांना Paytm चा धडा; आयपीओमधील गुंतवणूक पडली भारी, लाखो रुपयांना फटका

‘आयकर’ची नजर या 700 क्रिप्टो गुंतवणूकदारांवर ; करचुकवेगिरी करण्यात यांच्याएवढे माहीर कोणीच नाही…

टाटा समुहाकडून लवकरच UPI अ‍ॅप लाँच; Google Pay आणि Phone Pe ला देणार जोरदार टक्कर