Gold Hallmarking: हॉलमार्किंगच्या नियमातून ‘या’ व्यापाऱ्यांना आणि दागिन्यांना सूट

| Updated on: Jun 21, 2021 | 8:46 AM

Gold Hallmarking | सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते.

Gold Hallmarking: हॉलमार्किंगच्या नियमातून या व्यापाऱ्यांना आणि दागिन्यांना सूट
सोन्याची चकाकी मावळली, चांदीला झळाळी!
Follow us on

मुंबई: देशभरात 16 जूनपासून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक असेल. या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल. अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. (Gold Hallmarking know all details)

मात्र, या नियमातून काही व्यापाऱ्यांना आणि विशिष्ट दागिन्यांना वगळण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात देशातील काही जिल्ह्य़ांमध्ये नव्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. हॉलमार्क अनिवार्यतेतून वार्षिक 40 लाख उलाढाल असलेल्या सराफ पेढय़ांना वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात मांडण्यात येणारे दागिने, सोन्याची घड्याळे, फाऊंटन पेन, कुंदन, पोलकी, जडाव यासारख्या विशिष्ट दागिन्यांसाठीही हॉलमार्क बंधनकारक नसेल.

हॉलमार्किंग म्हणजे नेमकं काय?

सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण करण्याचे एक साधन म्हणजे हॉलमार्किंग. एखाद्या धातूची विश्वासार्हता प्रदान करण्याचे माध्यम म्हणजे हॉलमार्किंग असे म्हटलं जाते. हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. जर दागिन्यांवर हॉलमार्क असेल तर ते शुद्ध आहे, असे प्रमाणित केले जाते.

BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोने खरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करा. जर त्यावर हा हॉलमार्क असेल तर ते सोनं शुद्ध आहे. मात्र अनेकदा काही ज्वेलर्स तपास न करता हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा आहे की नाही याची तपासणी करणे आवश्यक आहे.

भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.

संबंधित बातम्या:

Gold Hallmarking: सोन्याच्या दागिन्यांवरील हॉलमार्किंगचा ग्राहकांना काय फायदा होणार?

Gold Hallmarking: सोने हॉलमार्किंगचा नवा नियम लांबणीवर पडणार? वाचा नेमकं कारण

Gold Hallmarking: हॉलमार्किंग बंधनकारक; आता सोन्याच्या जुन्या दागिन्यांचं काय होणार?

(Gold Hallmarking know all details)