
पावसाळा सुरू झाला की वातावरणात दमटपणा वाढतो, हवामान थोडं थंड होतं, पण तरीही घरात उष्मा जाणवतो. याच कारणामुळे अनेक घरांमध्ये एसी (Air Conditioner) वापरणं सुरूच राहतं. मात्र, उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात एसी कसा वापरावा, कोणता मोड योग्य असतो, याबद्दल अनेकांना संभ्रम असतो. चुकीच्या पद्धतीने एसी वापरल्यास वीजेचा अतिरिक्त खर्च होतोच, पण आरोग्यावरही त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता (Humidity) खूप वाढलेली असते. त्यामुळे जरी तापमान तुलनेने कमी असलं, तरी त्वचेला चिकटपणा जाणवतो, घाम जास्त येतो आणि घरात भिजटपणा जाणवतो. यामुळे एसी वापरणं गरजेचं वाटतं, परंतु उन्हाळ्यासारखा cool mode वापरणं पावसाळ्यात तितकंसं फायदेशीर ठरत नाही.
“Dry Mode”
नेहमीच्या Cool Mode मध्ये AC सतत तापमान कमी करत राहतो, पण पावसाळ्यातील दमट हवामानात हाच मोड जास्त विजेचा वापर करतो आणि हवेतील आर्द्रतेवर प्रभाव टाकत नाही. याऐवजी “Dry Mode” वापरणं अधिक फायदेशीर ठरतं.
Dry Mode हा मोड विशेषतः आर्द्रता कमी करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या मोडमध्ये एसी तापमान जास्त न बदलता, फक्त हवेतील ओलावा (moisture) कमी करतो. त्यामुळे घरात कोरडेपणा जाणवतो आणि वातावरण अधिक आरामदायक होतं. यामध्ये कंप्रेसरही सतत चालू राहत नाही, त्यामुळे विजेची बचत होते.
Dry Mode चा सिम्बॉल प्रामुख्याने एसीच्या रिमोटवर पाण्याच्या थेंबासारखा दिसतो. सर्व ब्रँड्समध्ये तो ठराविक स्वरूपाचा नसला, तरी ‘Dry’ किंवा ‘Dehumidifier’ असं लिहिलेलं असतं. एकदा हा मोड निवडल्यावर एसी काही वेळात घरातील आर्द्रता कमी करतो आणि हवामान सुखद बनवतो.
Dry Mode चा आणखी एक फायदा म्हणजे आरोग्यवर्धक वातावरण. दमट हवेमुळे घरात बुरशी (fungus), साचा (mold), किंवा दमट वास निर्माण होतो. Dry Mode याविरोधात प्रभावी ठरतो, कारण तो हवेतील ओलावा शोषून घेतो आणि अशा बॅक्टेरिया वाढण्यास अडथळा आणतो.
1. Dry Mode फक्त आर्द्रता कमी करतो, त्यामुळे तो खूप उष्णतेच्या दिवसांमध्ये उपयोगी ठरत नाही.
2. एकाच खोलीत दररोज काही तास वापरणं हे पुरेसं असतं.
3. खिडक्या आणि दरवाजे बंद ठेवणं महत्त्वाचं आहे, अन्यथा बाहेरून पुन्हा आर्द्रता आत येऊ शकते.