जगातली सर्वात जुनी जिन्स, किती फाटकी? केवढ्यात घ्यावी? अहो, येवढ्या पैशांत तर BMW…

World Most Expensive and old Jeans ची सध्या जोरदार चर्चा आहे. कारण तिची अवस्था आणि सध्या तिला आलेली किंमत तोंडात बोटं घालायला लावणारी आहे....

जगातली सर्वात जुनी जिन्स, किती फाटकी? केवढ्यात घ्यावी? अहो, येवढ्या पैशांत तर BMW...
Image Credit source: social media
| Updated on: Oct 14, 2022 | 12:34 PM

जगातील सर्वात जुनी जिन्स (Old Jeans) कोणती, हा प्रश्न कुणाच्या मनात आला नसेल. पण सर्वात महाग जिन्स (Expensive Jeans) कोणती हे शोधताना या प्रश्नापर्यंत जाऊन पोहोचाल. कारण नुकत्याच अशा एका जिन्सचा लिलाव झालाय. ती जीन्स केवढी जुनी असावी? तर विमानाचा (Airplane) शोध, ट्रॅफिक लाइट आणि रेडिओ येण्यापूर्वीची ही जिन्स असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळेच या जिन्सला एवढं महत्त्व प्राप्त झालंय.

बाजारात खरेदी करायला गेलं तर एकापेक्षा एक ब्रँडेड जिन्स असतात. क्वालिटी आणि कंफर्टनुसार आपण त्या खरेदीही करतो. पण एका जिन्ससाठी कुणी 63 लाख रुपये देऊ शकतो का… मेक्सिकोत एका व्यक्तीने अशी खरेदी केली आहे.

ही जिन्स लेविस कंपनीची आहे. 1880 सालची. या जिन्सचा नुकताच लिलाव झाला असून ती 76,000 डॉलर्स अर्थात  63 लाख रुपयांत खरेदी करण्यात आली.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, काइल हॉपर्ट याने ही जिन्स खरेदी केली. तो 23 वर्षांचा आहे. सॅन दिएगो, कॅलिफोर्नियात राहणारा. विंटेज कपड्यांचा तो डिलर. काइलने आतापर्यंत अनेक विंटेज कपडे खरेदी केले. पण यापैकी ही जिन्स सर्वात महागडी आहे.

ही जिन्स अमेरिकेतील एका निर्जन खाणीत सापडली.1880 च्या दशकात ती तेथील दगडांखाली सापडल्याचं म्हटलं जातंय.

जिन्स 76,000 डॉलर्सला असली तरीही प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी त्याला 87,400 डॉलर्स भरावे लागले.

काइल हॉपर्टने इन्स्टाग्राम अकाउंटवर याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. मी 76,000डॉलर्सला ही जिन्स खरेदी केली असून एवढी जुनी जिन्स मला मिळालीय, याचा आनंद आहे. माझ्या समर्थनार्थ उभ्या असलेल्या सर्वांचे मी आभार मानतो.