VIDEO : Nagar Hospital Fire | नगरच्या शासकीय रुग्णालयाच्या आगीत 10 जणांचा होरपळून मृत्यू

अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

अहमदनगर शहरातील सरकारी रुग्णालयाला आग लागून 10 कोरोनाबाधित रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला ही आग लागली. शॉटसर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या घटनेने नगर शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तातडीने कोल्हापूरवरुन अहमदनगरकडे रवाना झाले आहेत. राज्यात सगळीकडे दिवाळीचा उत्साह सुरु असताना इकडे नगरमध्ये आज सकाळी साडे दहाच्या सुमारास सरकारी रुग्णालयाला आग लागली. ग्राऊंड फ्लोअरवर अतिदक्षता विभागाला आग लागली. या विभागात कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI