अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (26 ऑगस्ट) काबुल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 100 जणांचा मृत्यू झालाय. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. याशिवाय अनेक नागरिक गंभीर जखमी झालेत. एका अफगाण अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात जवळपास 143 लोक जखमी झालेत.
अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाहेर ISIS कडून हल्ला करण्यात आला. यात 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. इतर 18 सैनिक जखमी झालेत. दुसरीकडे ISIS-K या दहशतवादी समहुाने टेलीग्राम अकाउंटवर काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.