Ambeghar landslide : आंबेघरमध्ये 14 ते 16 लोक दबले, टीव्ही 9 चा प्रतिनिधी 4 तास चालत आंबेघरमध्ये
पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये (Ambeghar landslide) दरड कोसळून 14 ते 16 लोक दबले आहेत. 23 जुलैला तुफान पावसाने आंबेघरमध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर आली.
पाटण तालुक्यातील आंबेघरमध्ये (Ambeghar landslide) दरड कोसळून 14 ते 16 लोक दबले आहेत. 23 जुलैला तुफान पावसाने आंबेघरमध्ये दरड कोसळल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती समोर आल्यानंतर 35 तास उलटले तरीही अजून मदत आणि बचावकार्यासाठी इथे यंत्रणाच पोहोचली नाही. टीव्ही 9 मराठीचे कराडचे प्रतिनिधी दिनकर थोरात (Dinkar Thorat) हे चार तासांची पायपीट करत, डोंगर, दरे, ओढे, नाले पार करत आंबेघरमध्ये पोहोचले.
आंबेघर हा एक पाडा आहे. या गावात 8 घरं होती. यापैकी 4 घरांवर दरड कोसळून या घरातील 14 ते 16 लोक दबले आहेत. दुर्घटनेला 35 तास होऊन गेले मात्र मदत आणि बचावकार्य सुरु झालं नाही. आसपासच्या गावातील नागरिकांनी या गावात धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं.
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब

