Ahmedabad Plane Crash : माझं कुटुंब वाचलं पण..; नातवासाठी आजीचा आक्रोश
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातात अनेकांनी आपलं कुटुंब, जवळची माणसं गमावली आहेत. मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश न थांबणारा आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत चहाची टपरी चालवणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा देखील होरपळून मृत्यू झाला आहे. अहमदाबादच्या मेघानीनगर भागात असलेल्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलवर एअर इंडियाचं प्रवासी विमान काल कोसळलं त्यावेळी या ठिकाणी याच हॉस्टेलच्या बाहेर आपल्या आजीसह चहाची टपरी चालवणाऱ्या 14 वर्षीय मुलाचा देखील होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्याच्या आजीने टाहो फोडला आहे. तर या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, विमान या वस्तीगृहवर कोसळलं त्यावेळी वसतिगृहात अनेक भावी डॉक्टर्स होते. दुपारची जेवणाची वेळ असल्याने काहीजण जेवण करत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या भीषण अपघातात 24 विद्यार्थ्यानी आपला जीव गमावला. तर अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

