4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 16 October 2021

मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केलीय. केंद्र सरकारचा राज्यांच्या कारभारात होत असलेल्या हस्तक्षेपावरून उद्धव ठाकरेंनी प्रहार केलाय. महिला अत्याचार, संघ राज्य यावर चर्चा होणे आवश्यक आहे. बाबासाहेबांनी केंद्र आणि राज्यांना सार्वभौमत्व प्रदान केले गेले. आणीबाणी, परकीय आक्रमण आणि विदेशी धोरण हे तीनच विषय केंद्राला आहेत. यावर विचारवंतांनी, तज्ज्ञांनी उत्तर द्यावे. रोजच्या कारभरात केंद्राची लुडबूड होता कामा नये, असंही उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला सुनावलंय.

उद्धव ठाकरे शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलत होते. सत्तेच्या व्यसनात इतरांची आयुष्य बरबाद करणाऱ्यांनी आता ते बंद करावे. मार्मिक सदर वाचा आणि थंड बसा. भूमिपुत्रावर होणाऱ्या अन्यायाला वाचा. मी मुख्यमंत्री आहे हिंदुत्ववादी आहे. परंतु समानतेची हिंदुत्वाची शिवसैनिकांना शिकवण आहे. सत्ताधारी म्हणून सगळा देश माझा आहे, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

हा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता. त्या देशामध्ये महाराष्ट्र लाल, बाल आणि पाल पुढे होता, महाराष्ट्र एक पुढे होता, पंजाब एक पुढे होता आणि पश्चिम बंगाल एक पुढे होता. बंगालनं त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. खरोखर ममतादीदी आणि बंगाली जनतेला मी धन्यवाद देतोय. तुम्ही ती न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे. तीच जिद्द आपल्यासुद्धा रगामध्ये आणि रक्तामध्ये आहे ही आपल्याला तयारी ठेवावी लागेल. हर हर महादेव म्हणजे काय असतं हे पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्ताला दाखवण्याची वेळ येऊ नये, असं म्हणत त्यांनी एक प्रकारे भाजपला इशारा दिलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI