AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 9 August 2021

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 9 August 2021

| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 09, 2021 | 8:17 AM
Share

ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस झाले असतील त्यांना आपण 15 ऑगस्ट पासून लोकलमधून प्रवास करता येईल”, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. याविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी घोषणा केली आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या निर्णयांची अंमलबजाणी होणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानंतर महाराष्ट्र भाजपने थेट दिल्लीवरुन प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र हा निर्णय घेण्यासाठी उशीर झाला असं भाजपनं म्हटलंय.

राज्य सरकारच्या लोकसंदर्भातील निर्णयावर बोलताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil)  यांनी सरकारने हा निर्णय उशिरा घेतला असं म्हटलंय. “घेतलेल्या निर्णयाचं स्वागतच आहे. नेहमी सकारात्मक राहायला पाहिजे. पण उशीर झाला. व्यापार सुरु झाला पहिजे असं विरोधी पक्ष म्हणत होता. लोकल सुरु व्हायला पाहिजे अशी आमची मागणी होती. तसेच मंदिरं सुरु व्हायला पाहिजेत. दीड ते दोन वर्षांपासून लोक बंदीस्त आहेत. लोक वेडे व्हायला लागले आहेत. दीड ते दोन वर्षांपासून अर्थार्जन बंद आहे. त्यामुळे हा वर्ग कसा जगला याबद्दल प्रश्नच आहे,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Published on: Aug 09, 2021 08:17 AM

Follow Us