AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिपळूण, महाडसाठी मुख्यमंत्र्यांचा दीर्घकालीन प्लॅन, धोकादायक वस्त्यांपासून ते पुराच्या पाण्यापर्यंत काय काय करणार?

ठाकरे त्यांनी पूर आल्यानंतर जीवितहानी तसेच मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी मोठ्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

चिपळूण, महाडसाठी मुख्यमंत्र्यांचा दीर्घकालीन प्लॅन, धोकादायक वस्त्यांपासून ते पुराच्या पाण्यापर्यंत काय काय करणार?
UDDHAV THACKERAY
| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 8:51 PM
Share

मुंबई : कोरोना निर्बंध, तिसरी लाट, तसेच राज्यात नुकताच आलेला पूर या विषयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना ठाकरे त्यांनी पूर आल्यानंतर जीवितहानी तसेच मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी मोठ्या उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. (major measures need to be taken to prevent loss of life and property in rain and flood said cm uddhav thackeray )

धोकादायक वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करावं लागेल

यावेळी बोलताना “वेगळप्रसंगी कठोर निर्णय घेऊन पुढे आलेलं संकट थोपवावं लागेल. नाहीतर असे संकटं भविष्यातही येत राहतील. सध्या आलेल्या पुरात 29 निवारा केंद्रांवर आपण 50 हजार नागरिकांची राहण्याची सोय केली होती. अशी संकटं पुन्हा पुन्हा येऊ नयेत त्यासाठी ज्या धोकादायक वस्त्या आहेत त्यांचं पुनर्वसन करावं लागेल. ज्या गावांमध्ये पाणी घुसतं, तेथे व्यवस्थापन करण्यासाठी दूरगामी योजना आखावी लागेल. त्यासाठी सरकार पाऊल टाकत आहे. चिपळूण, महाडमध्ये शिरणाऱ्या पुराच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

पाण्याचा विसर्ग करावा लागला, त्यामुळे गावं पाण्यात गेले

“नैसर्गिक आपत्तींना आपल्याला तोंड द्यावं लागत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राज्यात आता पूर आला. हे सगळं विचित्र आहे. काही महिन्यांचा पाऊस एका दिवसात आला. पुरामुळे नद्या, धरणं ओसंडून वाहू लागले. धरणं भरल्यामुळे आपल्याला पाण्याचा विसर्ग करावा लागला. त्यानंतर सोडलेलं पाणी सांगली, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांतील गावांत गेलं. त्यानंतर चिपळून, महाड पाण्याखाली गेलं,” असं उद्धवन ठाकरे म्हणाले.

पूर येण्याचं, दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे

पुढे बोलताना त्यांनी सध्याच्या हवामान बदलाची माहिती दिली. ग्लोबल वार्मिंगमुळे बर्फ वितळत असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यात दरडी कोसळण्याचे तसेच पूर येण्याचे प्रमाण वाढत असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं.  “हे दरवर्षीचं संकट आहे. पावसामुळे काही दरडी कोसळल्या. रस्ते खचून गेले. दरडीमध्ये रायगडमध्ये गावंच्या गावं दबले.तळीयेमध्ये मी गेले होतो. तिकडे सगळे चिखल साचलेला होता. यामध्ये मोठी जीवितहानी झाली. पूर येण्याचं, दरडी कोसळण्याचं प्रमाण वाढत आहे,” असं ठाकरे म्हणाले.

इतर बातम्या :

Maratha Reservation : मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना मिळाला तर आरक्षण मिळणार का? मुख्यमंत्र्यांनी अडचण सांगितली

(major measures need to be taken to prevent loss of life and property in rain and flood said cm uddhav thackeray)

Follow Us
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?
जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये...
Tejaswi Ghosalkar | जेन-झीला खूश करण्यासाठी भाजपचा मास्टरप्लॅन? मुंबई लोकलमध्ये विद्यार्थ्यांसाठी 3 डबे राखीव ठेवण्याची मागणी!
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...