4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 18 August 2022 -TV9

भाजप नेते मोहित कंबोज यांच्या ट्वीट राड्यानंतर त्यांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता अनेक चर्चांना उत आला आहे.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

Aug 18, 2022 | 9:23 AM

मुंबई : राज्यातील सत्ता पालट झाल्यानंतर पुन्हा एकदा ईडीचे हत्यार वापरण्यात येत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. यासंदर्भात काल भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करत राष्ट्रवादीचा एक बडा नेता जेल मध्ये जाणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांनी सागर बंगल्यावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता अनेक चर्चांना उत आला आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रश्मी शुक्ला यांनी भेट घेतल्यानंतर त्या पुन्हा महाराष्ट्रात परतणार का अशीही चर्चा रंगली आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनाची आता सीआयडी चौकशी होणार आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी महासंचालकांना आदेश दिले आहेत.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें