4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 8 October 2021

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

ही राजकीय छापेमारी असेल किंवा आयकर असेल, सीबीआय असेल, ज्याप्रकारे महाराष्ट्रामध्ये छापेमारी सुरू आहे, हे सुडाचे राजकारण आहे. काय होईल सांगता येत नाही. अजित पवार यांच्यावर राजकीय राग असू शकतो. एखाद्या कुटुंबावर राजकीय कुटुंबावर अशाप्रकारे दहशत निर्माण करणारी छापेमारी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांवर सुरू आहे. हेही दिवस निघून जातील, दिल्लीत आमचेही दिवस येतील, अपना टाईम भी आयेगा, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली.

“दसरा मेळावा होणारच”

दसरा मेळावा नेहमीच्या पद्धतीने होईल, दसरा मेळावा हा देखील सांस्कृतिक उत्सव आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील ठरवलेला आहे. आम्ही देखील तशी तयारी करत आहोत. दसरा मेळावा होणार, आता हळूहळू कालपासून मंदिरे उघडली आहे. नियम पाळून सण साजरे होत आहे. दसरा मेळावा होईल पण कुठे होणार हे आता सांगू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI