VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 21 December 2021
बीडमध्ये पाच नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. चारही पंचायत समितीत शांततेत मतदान सुरू होतं. मात्र, वडणीतील तीन मतदान केंद्रांवर भाजप आणि राष्ट्रवादीत प्रचंड राडा झाला. दोन्ही गटात मतदान सुरू असताना शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली.
बीडमध्ये पाच नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. चारही पंचायत समितीत शांततेत मतदान सुरू होतं. मात्र, वडणीतील तीन मतदान केंद्रांवर भाजप आणि राष्ट्रवादीत प्रचंड राडा झाला. दोन्ही गटात मतदान सुरू असताना शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर प्रकरण हामरीतुमरीवर आलं. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन दोन्ही गटाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही गट आक्रमक झाल्याने कोणीही माघार घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे वाद अधिकच पेटला आणि बघ्यांची गर्दीही वाढल्याने अखेर पोलिसांना सौम्य लाठीमार करून दोन्ही गटांना पांगवावे लागले. पोलिसांच्या लाठीमारानंतर दोन्ही गटातील वाद निवळला आणि मतदान शांततेत सुरू झालं.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

