Kishori Pednekar | परदेशातून येणाऱ्या नागरिकांसाठी 5 सूत्री अॅक्शन प्लॅन तयार – किशोरी पेडणेकर
ओमिक्रॉनचे 30 संशयित मुंबई आढळल्यानंतर महापालिकेने (BMC) तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. हाय रिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
ओमिक्रॉनचे 30 संशयित मुंबई आढळल्यानंतर महापालिकेने (BMC) तातडीने खबरदारीच्या उपाययोजना राबवायला सुरुवात केली आहे. हाय रिस्क असलेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी एक अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. विदेशातून येणाऱ्यांसाठी हा पंचसूत्री अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. आज याची माहिती मुंबईच्या महापौर किशोऱी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई महापालिकेचा पाचसूत्री अॅक्शन प्लॅन काय?
– बीएमसीच्या वॉर्डांपर्यंत विदेशातून आलेल्या नागरिकांची लीस्ट पाठवली जाईल. हे नागरिक क्वारंटाइनच्या नियमांचे पालन करत आहेत का, यावर देखरेख ठेवली जाईल.
– वॉर रुमच्या सर्व वॉर्डमध्ये 10 अँब्युलन्स तयार राहतील.
– महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या टीम असतील. यात प्रवाशांच्या घरी जाऊन नियमांचे पालन करण्यासंबंधी चौकशी आणि तपासणी होईल.
– प्रवाशांच्या हौसिंग सोसायट्यांनाही पत्र पाठवले जाईल. त्यांनाही सदर सूचना दिल्या जाील.
मनसेचा उद्या 20वा वर्धापन दिन; राज ठाकरे रायगडकडे रवाना
टेक्नोलॉजीमुळे वृक्षलागवड करणं देखील शक्य! फडणवीसांनी दिली माहिती
ज्योती वाघमारेंकडून एकनाथ शिंदेंबद्दल गौरवोद्गार! म्हणाल्या...
राष्ट्रपतींच्या अपमानावरून पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींवर निशाणा

