‘लालपरी’त ५० टक्के महिलांना फ्री प्रवास, निर्णय झाला पण GR नाही; बघा Tv 9 मराठीचा रिपोर्ट

| Updated on: Mar 16, 2023 | 10:39 PM

VIDEO | देवेंद्र फडणवीस यांच्याकडून महिलांना एसटी बसमध्ये ५० टक्के सवलत पण अद्याप शासन आदेश नसल्याने चांगलाच गोंधळ बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

Follow us on

मुंबई : एसटी बसमध्ये महिला वर्गाला ५० टक्के मोफत प्रवास या निर्णयाची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली खरी पण या निर्णयाची अमंलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे शासन आदेश न निघाल्याने ग्रामीण भागात महिला प्रवाशांमध्ये गोंधळ उडाल्याने एसटीच्या वाहक आणि महिलांमध्ये मोठा वाद होत असल्याचे समोर येत आहे. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलतीचा निर्णय झाला पण जीआर नेमका कधी निघणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. या निर्णयाच्या गोंधळामुळे महिला प्रवासी आणि एसटी बस वाहकांमधील वाद हाणामारीपर्यंत येऊन पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयाद्वारे लातूरमधील एका महिला एसटी प्रवाशाचा आणि कंडक्टरच्या वादाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. बघा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसटीमध्ये महिला वर्गाला ५० टक्के मोफत प्रवास ही घोषणा केली. या घोषणेबाबतचा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट…