सिल्वासातील 500 कार्यकर्त्यांनी सोडली ठाकरेंची साथ, राज ठाकरेंच्या पक्षात ‘मनसे’ प्रवेश
नाशिक, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. इतकंच नाहीतर ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलं आहे. कारण सिल्वासा येथील उद्धव ठाकरे गटाचे तब्बल ५०० कार्यकर्ते आज मनसेत प्रवेश करणार आहेत
मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४ : शिवसेना पक्षात उभी फूट पडून दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मैदानात उतरुन पक्ष मजबूत करण्यासाठी जीवाचं रान सुरू केलंय. नाशिक, सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यानंतर आता उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. मात्र, या दौऱ्याआधीच उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. इतकंच नाहीतर ठाकरे गटाला मोठा खिंडार पडलं आहे. कारण सिल्वासा येथील उद्धव ठाकरे गटाचे तब्बल ५०० कार्यकर्ते आज राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते. रविवारी सकाळी १० वाजता मुंबईत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर हा पक्षप्रवेश होणार आहे. ऐन लोकसभा निवडणूका तोंडावर असताना ठाकरे गटाला बसलेला हा मोठा धक्का असल्याचे म्हटलं जात आहे.
Latest Videos
Latest News