73 वर्षीय तरूण उमेदवार लोकसभेच्या रिंगणात, मी निवडून आलो तर…; काय दिलं आश्वासन?
एकदा विधानसभा, दोन वेळा लोकसभा, तिन्ही वेळा डिपॉझिट जप्त आणि तरीही चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात एक तरूण उमेदवार उतरल्याने त्याची चर्चा होतेय. मोठ्या उत्साहाने 73 वर्षीय तरुण उमेदवार दिनकर संबारे हे अपक्ष म्हणून लोकसभा रिंगणात....
एकदा विधानसभा, दोन वेळा लोकसभा, तिन्ही वेळा डिपॉझिट जप्त आणि तरीही चौथ्यांदा लोकसभेच्या रिंगणात एक तरूण उमेदवार उतरल्याने त्याची चर्चा होतेय. मोठ्या उत्साहाने 73 वर्षीय तरुण उमेदवार दिनकर संबारे हे अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवत आहेत. शिक्षण फक्त दहावी पर्यंत झाले तरीही प्रथम जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटला पाहिजे, शेतकऱ्यांची एक इंचही जमीन न जाता प्रकल्प राबविणार असल्याचा निर्धार त्याचा आहे. तर नितीन गडकरींनी समृद्धी केला, पण सुपीक जमिनी खराब केल्यात… शेतकरी नेते रविकांत तुपकर जर निवडून आले तर दुसऱ्या दिवशी काय करतील सांगता येत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील जनता माझ्या पाठीमागे राहील, महायुती किंवा महा विकास आघाडीचे उमेदवारचे नाही पण जर मी निवडून आलो तर देशात शेतकरी आत्महत्या होऊ देणार नाही, असे म्हणत तरुणांनी नशापणी न करता आपले शरीर बनवावे, असे आवाहनही त्यांनी तरूणांना केले.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

