BIG Breaking : आता सातबाऱ्यावर आईचंही नाव लागणार, कुणासाठी होणार नियम लागू?
आता सातबाऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याच्या सूचना भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता सातबाऱ्यावर आईचंही नाव दिसणार आहे. भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे सातबाऱ्यावर आईचं लागणार आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर आता सातबाऱ्यावरही अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याच्या सूचना भूमी अभिलेख विभागाने घेतला आहे. त्यामुळे आता सातबाऱ्यावर आईचंही नाव दिसणार आहे. भूमी अभिलेख विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार यापुढे सातबाऱ्यावर आईचं लागणार आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये अंमलबजावणी केली जाणार आहे. तर १ मे २०२४ नंतर ज्या व्यक्तीचा जन्म होईल, अशा व्यक्तींसाठी हा नवा नियम लागू होणार आहे. दरम्यान, १ मे २०२४ नंतर जन्म झालेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा समावेश होणार आहे. तसेच पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेशाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या

