‘आप’कडून क्रिकेटर हरभजन सिंगला उमेदवारी जाहीर
'आम आदमी पार्टी'कडून क्रिकेटर हरभजन सिंगला उमेदवारी जाहीर झाली आहे. हरभजनला राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे.
‘आम आदमी पार्टी’कडून क्रिकेटर हरभजन सिंगला उमेदवारी जाहीर झाली आहे. हरभजनला राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. पंजाबमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तेवर आले आहे. हरभजन सिंगकडे क्रीडा विश्वविद्यालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी जालंधरमध्ये क्रीडा विश्वविद्यालय बनवण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीत आपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. विधानसभेच्या 117 पैकी 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. हरभजन सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने आम आदमी पार्टी आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

