AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिपके अटकेत असताना 'हा' मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव

दिपके अटकेत असताना ‘हा’ मराठी मुलगा करणार CJP चं नेतृत्व; जाहीर केलं मोठं नाव

| Updated on: Oct 10, 2026 | 1:43 PM
Share

राहुल गांधींनी सरकार कोसळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे, कारण त्यांना भारतीय नागरिकांचा मोठा पाठिंबा असल्याचे ते म्हणतात. लोकांच्या पाठिंब्याशिवाय काहीही शक्य नाही, असे सांगत त्यांनी लोकप्रतिनिधींना महत्त्व दिले आहे.

दिल्ली विमानतळावर आज काँग्रेस आंदोलनादरम्यान मोठी कारवाई करत पोलिसांनी सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतले आहे. दीपके यांच्यासोबत आशुतोष रांका आणि सौरव दास यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच तत्काळ पोलिसांनी विमानात जाऊन ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दीपके यांचे विमान दिल्लीत लँड होताच पोलिसांच्या हालचाली वाढल्या होत्या.

महिला पोलीस अधिकाऱ्यांनी दीपके यांना विमानातूनच ताब्यात घेतले. यावेळी अभिजीत दीपके यांनी, “मी अटक होण्यासाठीच आलो आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. काँग्रेसच्या या दिल्लीतील आंदोलनादरम्यान घडलेली ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. अभिजीत दीपके यांना ताब्यात घेतल्यानंतर आंदोलनाचे नेतृत्व आता अजिक्य शिंदे करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Published on: Oct 10, 2026 01:42 PM

Follow Us