Special Report | प्रभाकर साईलच्या आरोपांवरुन समीर वानखेडेंवर कारवाई होणार ?

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची सेटलमेंट झाल्याचा दावा केला होता. त्यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर प्रभाकर साईल यांनी आरोप केला होता.

मुंबई : क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. एनसीबीच्या या कारवाईत साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तसेच त्यांचा या संदर्भातील एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची सेटलमेंट झाल्याचा दावा केला होता. त्यातील 8 कोटी रुपये हे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप केला होता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI