Kranti Redkar | नवाब मलिकांसाठी आमच्याकडे वेळ नाही, क्रांती रेडकर यांचा टोला

नवाब मलिक मीडियासमोर काही कागदपत्रं दाखवत असतील आणि तुम्ही तेच सत्य मानत असाल तर कृपया डोळे उघडा. माझी हातजोडून विनंती आहे, असं क्रांती म्हणाली.

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक हे खूप मोठे नेते आहेत. ते रोज नवा आरोप करत आहेत. काही कागदपत्रंही दाखवत आहेत. मात्र, त्यांचे सर्व दावे आणि पुरावे खोटे आहेत. त्यात काही तथ्य नाही, असा दावा अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी केला आहे. क्रांती रेडकर यांनी सासरे ज्ञानदेव वानखेडे यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. रामदास आठवले आम्हाला भेटले हे कुणाला दुर्देवाचं वाटत असेल तर आम्ही जायचं कुठे? एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठी उभं राहणं चुकीचं आहे का? आम्ही आठवलेंना सर्व कागदपत्रं दिली आहेत. नवाब मलिक मीडियासमोर काही कागदपत्रं दाखवत असतील आणि तुम्ही तेच सत्य मानत असाल तर कृपया डोळे उघडा. माझी हातजोडून विनंती आहे, असं क्रांती म्हणाली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI