Aaditya Thackeray यांचं खोचक भाष्य; म्हणाले, ‘…अन् अर्ध्या तासात मुख्यमंत्र्यांचा परदेश दौरा रद्द’
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. इंग्लंडसह जर्मनी असा १० दिवसांचा परदेश दौरा रद्द, आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा पुढे ढकलल्यानंतर एक ट्वीट करत लगावला खोटक टोला
मुंबई, २६ सप्टेंबर २०२३ | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १ ऑक्टोबरपासून परदेश दौऱ्यावर जाणार होते. यावेळी त्यांच्यासोबत उद्योगमंत्री उदय सामंत आणि काही अधिकारी देखील परदेश दौऱ्यावर जाणार होते. मात्र इंग्लंडसह जर्मनी असा १० दिवसांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या परदेश दौऱ्यावरून उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परदेश दौऱ्यावर खोचक भाष्य केले आहे. ‘माझ्या ट्वीटनंतर अध्या तासात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परदेश दौरा रद्द करण्यात आला आहे. तर एकनाथ शिंदे यांचा फक्त सुट्टीसाठी परदेश दौरा होता. तर शिंदे यांचा इंग्लंड, जर्मनी हा दौरा दावोसच्या दौऱ्याप्रमाणे होता’, असा टोलाही त्यांनी लगावला.
अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका;आंबा, चिकू व ज्वारी पिकांचे नुकसान
अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरू; चार मोबाईल नंबर वापरत असल्याचे उघड
दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी TV9 Network चा विशेष उपक्रम

