Ujjwal Nikam | प्रकरण मीडियामध्ये जाणे, राजकीयांचे आरोप, जनतेच्या मनात शंका उत्पन्न करणे चुकीचे

एखादा साक्षीदार उघडपणे आरोप करत असेल तर याचा अर्थ तो साक्षीदार फुटला आहे, असे देखील सकृद्दर्शनी म्हणावे लागेल. त्याचा गंभीर परिणाम होतात. त्या तपास कामांत आरोप निष्पन्न झाले असतील या आरोपींवर अति विपरीत परिणाम होऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

नागपूर: क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एका साक्षीदाराने थेट एनसीबीवरच धक्कादायक आरोप केले आहेत. त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण नेमकं काय वळण घेणार याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणावर ज्येष्ठ वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला आहे. एखाद्या तपास कामात तपास अधिकाऱ्याबद्दल काही आरोप झाले तर त्या अधिकाऱ्यांच्या वरिष्ठांना त्याचा तपास करण्याचा अधिकार असतो. त्याप्रमाणे या अधिकाऱ्याविरोधात साक्षीदाराने आरोप केले असेल तर ते वरिष्ठ अधिकारी तपासतात. मात्र त्या अधिकारी विरोधात कारवाई होईलच असं नाही, असं निकम म्हणाले. हल्ली सुतावरून स्वर्ग गाठण्याचा प्रकार सुरू आहे. तपास एखाद्या गुन्ह्याचा सुरू असतो. त्यातील एखादा साक्षीदार उघडपणे आरोप करत असेल तर याचा अर्थ तो साक्षीदार फुटला आहे, असे देखील सकृद्दर्शनी म्हणावे लागेल. त्याचा गंभीर परिणाम होतात. त्या तपास कामांत आरोप निष्पन्न झाले असतील या आरोपींवर अति विपरीत परिणाम होऊ शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI