हायकोर्टाच्या ‘त्या’ आदेशानंतर मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस
आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावे, असे आदेश हायकोर्टाने दिले त्यानंतर मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. मुंबईतील आझाद मैदानात ५ हजार लोकंच येऊ शकतात, आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना मोर्च्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र...
मुंबई, २५ जानेवारी २०२४ : मनोज जरांगे पाटील यांना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखाल कळवण्यात यावे, असे आदेश हायकोर्टाने दिले त्यानंतर मुंबई पोलिसांकडून मनोज जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. मुंबईतील आझाद मैदानात ५ हजार लोकंच येऊ शकतात, आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांना मोर्च्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्या मैदानावर फक्त ५ हजार लोकांना परवानगी आहे, ही माहिती मनोज जरांगे पाटील यांना देण्यासंदर्भातील नोटीस बजावण्याचे निर्देश कोर्टाने पोलिसांना दिले होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सहावा दिवस आहे. मनोज जरांगे यांचा पायी मोर्चा सध्या लोणावळा येथे आहेत तर आजचा मुक्काम हा वाशी येथे असणार आहे, अशी माहिती मनोज जरांगे पाटलांनी दिली आहे. अशातच सरकारकडून जरांगेच्या मनधरणीचे पूर्ण प्रयत्न केले जात आहेत.
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

