भोंदूबाबाला जमीन विकल्यानंतर मुलगा बेपत्ता, पैसेही मिळाले नाहीत, शेतकऱ्याने सांगितले..
नाशिकचा भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत.त्याने महिला भाविकांचे लैंगिक शोषण केल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. त्याने अनेकांच्या जमीनी बळकावल्याचे समोर येत आहे.
नाशिक भोंदू ज्योतिषी अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप खरातवर होत आहेत. त्याने किळसवाणे प्रकार केले आहेत. अनेक लोकांच्या जमीनी खरातने बळकावलेल्या आहेत. या कामात त्याला राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मदत केल्याचे समोर येत आहे. एका शेतकऱ्याने त्याची जमीन विकल्यानंतर त्याचा मुलगा बेपत्ता झाल्याचे म्हटले आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारातील शिवाजी खंडू ढगे यांनी ही धक्कादायक माहिती दिली आहे. आपल्या मुलाने खरातला जमिन विकली आणि त्यानंतर त्याचे पैसे मिळाले की नाही माहिती नाही आणि मुलगा त्यानंतर मिसिंग झाला असल्याचे शिवाजी ढगे यांनी म्हटले आहे. भोंदू बाबा अशोक खरात यांची नाशिकच्या पाथर्डी शिवारात ४० एकराहून अधिक जमीन आहे. त्याने सगळ्या जमीनीला कंपाऊंड घातलेले आहे. अशोक खरात हा अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशीच आपल्या जागा बघण्यासाठी यायचा अशी माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. अनेकदा एजंट दीपक लोंढे हा देखील खरातसोबत असायचा. त्यांनी गावात काही वेळेस दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. खरात याने पाथर्डी शिवारात अनेक व्यवहारात पैसे बुडवल्याचा आरोपही करण्यात येत आहे.
Published on: Mar 22, 2026 12:02 PM
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात

