AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ahmedabad Plane Crash : 40 सेकंदात नेमकी कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?

Ahmedabad Plane Crash : 40 सेकंदात नेमकी कुठं चूक झाली? लंडनला जाणाऱ्या विमान अपघाताची कारणं काय?

Updated on: Jun 14, 2025 | 10:57 AM
Share

40 सेकंदात विमानात नेमकं काय घडलं? अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने टेक ऑफ नंतर अवघ्या 40 सेकंदात कोसळलं. ज्यात विमानातील एक प्रवासी सोडून, सर्व 241 प्रवासी मृत्यूमुखी पडले. पण सर्वांना प्रश्न हाच पडला आहे की नेमका अपघात कसा झाला? 40 सेकंदात नेमकं काय घडलं की विमान क्रॅश झालं? तज्ज्ञांनी नेमकी कोणती कारण सांगितली आहेत?

टेक ऑफच्या अवघ्या 40 सेकंदात अहमदाबादहून लंडनला जाणारं विमान कोसळलं. 40 सेकंदात असं काय घडलं की विमान क्रॅश झालं? विमान कोसळण्याचं कारण नेमकं काय?विमान जेव्हा आकाशात झेपावतं तेव्हा विमानाचे फ्लॅक्स म्हणजेच पंख, थ्रस्ट म्हणजेच इंजिन पॉवर आणि लँडिंग गिअरवर उचलणं या महत्त्वाच्या बाबी असतात. एअर इंडियाचे माजी पायलट मन्मथ कुमार यांनी टेक ऑफ पासून ते स्फोट होण्यापर्यंत हालचाल पाहून तीन ते चार कारणं सांगितली आहेत.

ज्यामध्ये पहिलं कारण असू शकतं विमान पूर्ण क्षमतेने लोड असताना थ्रस म्हणजेच इंजिन पॉवर मध्ये गडबड. विमानाने टेक ऑफ केला तेव्हा विमानाला आकाशात उंच झेप घेण्यासाठी ताकद मिळाली नाही म्हणजेच थ्रसमध्ये प्रॉब्लेम आला असावा.

दुसरं कारण लँडिंग गिअर वर गेले नाहीत. कोणताही विमान टेक ऑफ करत तेव्हा काहीच सेकंदातच ही चाकं अर्थात लँडिंग गिअर वरच्या दिशेने आत जातात. अपघातग्रस्त एअर इंडियाच्या या विमानानं जेव्हा टेक ऑफ केलं तेव्हा कोसळेपर्यंत लँडिंग गिअर वरच्या दिशेने आत गेलेच नाही.

तिसरं कारण असू शकतं टेक ऑफच्या वेळी कॉन्फिगरेशन एअर म्हणजेच तांत्रिक चूक किंवा ऑपरेशनल चूक झाली का? विमानाचे फ्लॅक्स अर्थात विमानाचे पंख जे आहेत त्यांच्या सेटिंगमध्ये चूक झाली का? फ्लॅक्स विमानाला झेप घेण्यासाठी मदत करतात. जर फ्लॅक्सच्या सेटिंगमध्ये गडबड झाली तर विमान आकाशात जाऊ शकत नाही.

चौथं कारण असू शकतं या विमानाच्या रिपेअरिंगच्या वेळी काही चूक असणं. काही दिवसांआधीच या विमानाचं मोठं काम झालं होतं, अशी माहिती मिळतेय.

Published on: Jun 14, 2025 10:57 AM