AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Crash : एअर इंडियाचं विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, 'त्या' प्रवाशानं अपघात होण्यापूर्वी काय केलं होतं ट्विट?

Plane Crash : एअर इंडियाचं विमान क्रॅश होणार हे आधीच कळलं?, ‘त्या’ प्रवाशानं अपघात होण्यापूर्वी काय केलं होतं ट्विट?

Updated on: Jun 12, 2025 | 7:24 PM
Share

या प्रवाशाने एअर इंडियाच्या विमानातील वाईट परिस्थितीचा व्हिडिओही बनवला होता. आकाश वत्सचा दावा आहे की विमानात खूप विचित्र परिस्थिती होती. विमानाचा एसी काम करत नव्हता. विमानाचा एव्ही स्क्रीन, टीव्ही आणि रिमोट देखील व्यवस्थित काम करत नव्हता. ज्यामुळे प्राणघातक घटनेपूर्वी विमानाच्या स्थितीबद्दल चिंता निर्माण करत असल्याचे त्याने म्हटलं होतं.

अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय १७१ हे विमान उड्डाणानंतर काही मिनिटांतच कोसळले. विमानात २४२ प्रवासी होते.  या सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा दावा एपी या वृत्तसंस्थेकडून केला जात आहे. दरम्यान, ट्विटर (एक्स) वर अचानक एक नाव चर्चेत आले आहे, ते नाव आहे आकाश वत्स (Akash Vatsa)

अपघात होण्याआधीचा विमानातील एक व्हिडीओ प्रवाशाकडून टि्वट करण्यात आला होता. या प्रवाशाचं नाव आकाश वत्स असं असून त्याने अपघात होण्याआधी एक व्हिडीओ ट्विट केल्याची माहिती समोर येत आहे. अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानातील एसी आणि स्क्रिनटच टीव्ही बंद आहे असी तक्रार या ट्विटमध्ये आकाश वातसा या प्रवाशानं केली होती. या प्रवाशाने दिल्ली ते अहमदाबाद असा विमान प्रवास केल्याचा दावा केला आहे. तर हेच विमान नंतर अहमदाबादवरून लंडनसाठी उड्डाण घेत होतं, असंही त्याने म्हटले आहे.

आकाश वत्सने दावा केला की, “मी अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या त्याच फ्लाइटमध्ये होतो – टेकऑफच्या सुमारे २ तास आधी. मी दिल्लीहून अहमदाबादला त्याच विमानाने आलो होतो. मला फ्लाइटमध्ये काही गोष्टी लक्षात आल्या होत्या, ज्याचा मी एक व्हिडिओ देखील बनवला होता जेणेकरून मी एअर इंडियाला ट्विट करू शकेन. मला अधिक माहिती द्यायची आहे. कृपया माझ्याशी संपर्क साधा.”

 

 

 

Published on: Jun 12, 2025 07:24 PM