AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Air India Plane Crash : अपघाताचं कारण येणार समोर DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते दुर्घटनेची माहिती?

Air India Plane Crash : अपघाताचं कारण येणार समोर DVR अन् ब्लॅकबॉक्सही सापडलं, कशी मिळते दुर्घटनेची माहिती?

Updated on: Jun 13, 2025 | 6:55 PM
Share

डीव्हीआरमध्ये कॉकपिटमध्ये असलेल्या पायलटचा आवाज हा रेकॉर्ड झालेला असतो. त्यानंतर नेमका अपघात कसा झाला? अपघाताच्या वेळेला सिच्युएशन काय होती? या संदर्भात माहिती मिळू शकणार आहे.

अपघातग्रस्त विमानाचा डीव्हीआर आता सापडलेलं आहे. विमानाचा इमर्जन्सी लोकेटर ट्रान्समीटर देखील सापडलेलं आहे. हा एक ब्लॅक बॉक्स सिस्टीमचाच भाग आहे. विमानाचा डीव्हीआर फॉरेन्सिक टीमने ताब्यात घेतलेला आहे. अपघाताच्या चौकशीसाठी डीव्हीआर हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे.

डीव्हीआर म्हणजे काय?

डिजिटल व्हॉईस रेकॉर्डर. डीव्हीआर विमानाच्या कॉकपिटमधील संवाद रेकॉर्ड करतो. डीव्हीआर पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलमधील संभाषणही रेकॉर्ड करतो. डीव्हीआर कॉकपिटमधील अलार्म, स्विच, इंजिनचा आवाजही टिपतो. डीव्हीआर शेवटच्या दोन ते 25 तासांचा ऑडिओ रेकॉर्डिंग साठवतो. डीव्हीआरमुळे अपघाताचं नेमकं कारण शोधायला मोठी मदत होते.

विमानाला ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? 

ब्लॅक बॉक्स ही विमानातील एक विशेष उपकरण प्रणाली आहे. ब्लॅक बॉक्समध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डरचा समावेश असतो. नाव ब्लॅक बॉक्स असलं तरी हे उपकरण केशरी रंगाचं असतं. ब्लॅक बॉक्स विमानाच्या उड्डाणादरम्यानच्या महत्त्वाच्या माहितीचं संकलन आणि संरक्षण करत असतो. ब्लॅक बॉक्स सामान्यतः विमानाच्या मागील भागामध्ये म्हणजेच टेल सेक्शनमध्ये बसवलेला असतो. हा भाग अपघातामध्ये तुलनात्मक दृष्ट्या कमी नुकसानग्रस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहतो. ब्लॅक बॉक्स मजबूत धातूपासून बनवलेला असतो, जो अत्यंत उच्च तापमान, दाब आणि पाण्याखालीही टिकू शकतो. ब्लॅक बॉक्समध्ये विमानाच्या उड्डाणाशी संबंधित तांत्रिक माहिती रेकॉर्ड केली जाते.

Published on: Jun 13, 2025 06:55 PM