AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Plane Crash : लोखंड वितळलं, 265 प्रवाशी जळून राख, पण भगवद्गीता जशीच तशी! एकही पान जळालं नाही; बघा VIDEO

विमान अपघातानंतर घटनास्थळावरील दृश्य खूपच हृदयद्रावक होते. जिथे सर्व काही जळून खाक झाले होते, तिथे एक चमत्कार पाहायला मिळाला. बचाव कार्यादरम्यान, पथकाला एक भगवद्गीता सापडली, जी एखाद्या प्रवाशाची असू शकते. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे या धार्मिक ग्रंथाचे थोडेसेही नुकसान झाले नाही.

Plane Crash : लोखंड वितळलं, 265 प्रवाशी जळून राख, पण भगवद्गीता जशीच तशी! एकही पान जळालं नाही; बघा VIDEO
bhagwatgita plan crash
| Updated on: Jun 13, 2025 | 4:19 PM
Share

अहमदाबादमध्ये काल गुरूवारी १.३० वाजता झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण राज्यासह देशही हादरला आहे. एअर इंडियाचे लंडनला जाणारे विमान एआय-१७१ अहमदाबादहून उड्डाण करत होते अन् अवघ्या काही क्षणात ते कोसळले. एअर इंडिया विमानाच्या झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २६५ जणांचे मृतदेह हाती लागल्याची माहिती मिळतेय. हे विमान कोसळल्यानंतर दुर्घटनास्थळावरून विमानाचे अवशेष आणि मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्रभर सुरू आहे. यादरम्यान एक आश्चर्यकारक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.

प्रवाशी जळून खाक पण भगवद्गीता सुरक्षित 

दुर्घटनास्थळावरून बचाव पथकाला एक भगवद्गीता सापडली आहे. विशेष म्हणजे भीषण अपघातात सर्व काही जळून खाक झाले. विमानाचे लोखंडी अवशेषही पूर्णतः वितळले, मात्र कागदाची भगवद्गीता जशीच तशी हाती लागल्याचा दावा केला जात आहे. विमान अपघातात २६५ प्रवाशी जळून राख रांगोळी झालेली असताना या ढिगाऱ्यात भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित सापडल्याचा दावा केला जात आहे. याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय की, भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित असून त्यांचं एकही पान जळालेलं नाही. किंवा या भगवद्गीतेचा एकही कोपरा फाटला ना जळून खाक झाला.

बघा व्हिडीओ

व्हिडीओमध्ये नेमकं काय ?

या व्हिडिओमध्ये विमान अपघाताची जागा दाखवण्यात आली आहे. बचाव कार्यादरम्यान, एक व्यक्ती भगवद्गीता घेऊन जाताना दिसत आहे. ही भगवद्गीता पूर्णपणे सुरक्षित आहे. एक व्यक्ती गीतेची पाने देखील उलटून दाखवत आहे. हा व्हिडिओ गुजराती भाषेत असून भगवद्गीता भीषण अपघातात सुरक्षित आढळल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तिथे उपस्थित असलेले लोक याला चमत्कार म्हणून पाहत आहेत. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

विमान अपघातानंतर गंभीर स्वरूपात जळालेल्या प्रवाशांच्या अवस्थेत आणि खाक झालेल्या विमानाच्या अवशेषांमध्ये भगवद्गीता सुरक्षित हाती लागणं हा चमत्कार मानला जात आहे. इतकंच नाहीतर हा प्रकार लोकांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे प्रतीक बनले आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.