VIDEO : Ahmednagar Leopard | घुलेवाडी ते समनापूर रस्त्यावर अचानक बिबट्याचं दर्शन, परिसरात भीतीचे वातावरण

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Sep 13, 2022 | 2:29 PM

अहमदनगरच्या घुलेवाडी ते समनापूर रस्त्यावर काल रात्री अचानक बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे. समनापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले होते.

अहमदनगरच्या घुलेवाडी ते समनापूर रस्त्यावर काल रात्री अचानक बिबट्याचे दर्शन झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळते आहे. समनापूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले होते. त्याच आता काल रात्री घुलेवाडी ते समनापूर रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाले असून वाहनचालकाने याचा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. आता हा बिबट्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोयं. वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्याला पकडावे अशी मागणी आता ग्रामस्थांनी केलीयं.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI