Air India Plane Crash : टेकऑफनंतर 5 मिनिटातच प्लेन क्रॅश, DCGA नं दिली अधिकृत माहिती, बघा VIDEO
अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना आज दुपारी घडली. नेमकं काय घडलं? अधिकृत माहिती काय आली समोर? बघा व्हिडीओ
अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. विमानाने अहमदाबादहून गुरूवारी दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी धावपट्टी 23 वरून टेकऑफ केले होते. धावपट्टी 23 वरून टेक ऑफ केल्यानंतर लगेचच विमान जमिनीवर कोसळले. अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसतेय की, विमानाने टेकऑफ केले आणि नंतर तब्बल 625 फूट उंचीवर पोहोचले असतानाच काही क्षणातच हे विमान खाली कोसळले.
नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA) ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, एअर इंडियाच्या B787 ड्रीमलायनर विमानाने 1:38 वाजता अहमदाबादहून टेकऑफ केले. ADS-B डेटा नुसार, विमान 625 फूट उंचीवर पोहोचले आणि नंतर ते 475 फूट प्रति मिनिट या वेगाने खाली कोसळले. विमानात 2 पायलट आणि 10 केबिन क्रूसह 242 लोकं प्रवास करत होते. या विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांनी केले होते.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?

