Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत मोठी बातमी, आतापर्यंत इतके मृतदेह….
अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी एक मोठी माहिती दिली आहे. प्रवाशांव्यतिरिक्त, अपघातस्थळावरून २१ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. डीएनए चाचणी सुरू आहे. आतापर्यंत अपघातस्थळावरून २७० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
अहमदाबाद येथील विमान अपघाताच्या दुर्घटनेला चार दिवस उलटले असले तरी अद्याप अपडेट्स समोर येत आहेत. आतापर्यंत या अपघातातील मृतांची संख्या २७० वर पोहोचली आहे. दरम्यान, अहमदाबाद येथील सिव्हिल हॉस्पिटलचे अतिरिक्त वैद्यकीय अधीक्षक डॉ. रजनीश पटेल यांनी मोठी माहिती दिली आहे. अपघातातील एकूण ३१ मृतदेहांचे डीएनए जुळले असून १२ मृतदेह त्यांच्या संबंधित कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. तर इतर लोकं येऊन आपल्या नातेवाईकांचे मृतदेह ताब्यात घेतील याची आम्ही वाट पाहत आहोत, असेही रजनीश पटेल यांनी सांगितले. तर माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबाबत बोलताना डॉ. रजनीश पटेल म्हणाले, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या मृतदेहाची ओळख पटवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर

