Ajit Pawar : माळेगाव साखर कारखाना निवडणूक; अजित पवारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न
Malegaon Sakhar Karkhana Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आज पार पडत आहे. त्यासाठी मतदान देखील सुरू झालेलं आहे. अत्यंत प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक मानली जाते. यात स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार हे उमेदवार आहेत. अजित पवार यांचं निळकंठेश्वर पॅनल, तर पवारांचा बळीराजा पॅनल या निवडणुकीत आहे. त्यांच्या विरोधात 85 वर्षांच्या चंद्राराव तावरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. चंद्राराव तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनल हे या निवडणुकीत आहे. तसंच कष्टकरी शेतकरी संघर्ष समितीचं पॅनलसुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते आहे. चंद्राराव तावरे हे कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. या निवडणुकीसाठी अजितदादा गेल्या काही दिवसांपासून बारामतीत ठाण मांडून बसलेले आहे.
Published on: Jun 22, 2025 11:52 AM
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
