Ajit Pawar | सर्व घडवणारा मास्टर माईंड सभागृहात नव्हता : अजित पवार
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत झालेल्या वादानंतर आपली भूमिका मांडताना, सर्व घडवणारा मास्टर माईंड सभागृहात नव्हता असं म्हटलं आहे. त्यामुळे आता नव्याच चर्चांना उधान आलं आहे.
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत आपल्या वक्तव्याबाबत खुलासा केला आहे. तसेच त्यांनी आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगत आपण काहीही चुकीचं बोललं नसल्याचेही म्हटलं आहे. त्याचबरोबर सध्या जे घटत आहे. ते घडवणारा मास्टर माईंड सभागृहात नव्हता असेही अजित पवार यांनी म्हटलं आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर केलेल्या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला. त्यांच्याविरोधात आंदोलने करण्यात आली. यावरून आता अजित पवार यांनी थेट बोलताना सर्व घडवणारा मास्टर माईंड सभागृहात नव्हता असे म्हटलं आहे.
ज्यावेळी मी हे वक्तव्य केलं त्यावेळी मास्टर माईंड सभागृहात नव्हता. मास्टर माईंडच्या आदेशानंतरच हा वाद पेटला. तसेच मी जेव्हा सभागृहात बोलत होतो. तेव्हा सगळे शांत होते. त्यानंतर आता नव्याच चर्चांना उधान आलं आहे. तर तो नेता कोण आणि कोणत्या पक्षाचा अशी चर्चा होताना ही दिसत आहे.
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...

