Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
मुंबईतील वांद्रे येथे बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार कऱण्यात आला. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर वांद्र्यासह संपूर्ण मुंबईत तणावाचे वातावरण असून राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशातच शूटर्सला नाकाबंदी दरम्यान अटक करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री 9.15 च्या सुमारास गोळीबार झाला. वांद्रे पूर्व येथील बाबा सिद्दीकी यांच्या कार्यालयाजवळ ही घटन घडली. दरम्यान, शूटर्सला नाकाबंदी दरम्यान अटक व्हिडीओ समोर आला आहे. बाबा सिद्दीकींची हत्या करून पळून जाणाऱ्या आरोपींचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरलही होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून पळून जाण्याच्या प्रयत्नात हा आरोपी होता. मात्र हा आरोपी फरार होण्यापूर्वीच नाकाबंदी दरम्यान, पोलिसांनी त्याच्या मुसक्या अवळल्या आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर आरोपींकडून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले होते. या गोळीबारात बाबा सिद्दिकी यांना दोन गोळ्या छातीत लागल्या होत्या तर दुसरी गोळी पोटाच्या भागात लागली होती. अशा तीन गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या होत्या. दरम्यान, झिशान सिद्दिकी हे ऑफिसमध्ये असताना आणि बाबा सिद्दिकी हे ऑफिसबाहेर पडून आपल्या गाडीत बसले असताना त्यावर गोळीबार झाल्याचा आवाज आला. या गोळीबाराच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला.
पार्थ पवार 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरणार? 7 दिवस मुदतवाढ अन्...
बाळासाहेबांना ठाकरे बंधूंकडून अभिवादन...उद्यापासून जागा वाटप!
आजारी राऊत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर... भावाच्या हातात हात अन्...
अमित ठाकरेंवर पहिला गुन्हा; म्हणाले, मला अभिमान अन् आनंद...प्रकरण काय?

