Ajit Pawar on IT Raid | पाहुणे अजून घरी आहेत, ते गेल्यावर बोलेन; आयकर छाप्यांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आयकरचं धाडसत्र सुरु आहे. याशिवाय अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाडी टाकल्या.
पाहुणे घरात आहेत, ते आपलं काम करत आहेत. ते पाहुणे गेल्यानंतर मी माझी भूमिका मांडेन, जे सत्य आहे ते उघड होईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आयकर खात्याच्या (Income Tax) धाडीवर प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. सलग दुसऱ्या दिवशी आयकरचं धाडसत्र सुरु आहे. याशिवाय अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावरही आयकर विभागाने धाडी टाकल्या.
मुंबईतील नरिमन पॉईंट इथे असलेल्या निर्मल बिल्डिंगमध्ये पार्थ पवार यांच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. काही महत्वाची कागदपत्रे आयकर विभागाची टीम घेऊन गेल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या 26 तासांपासून छापेमारी सुरु आहे. 7 तारखेला सकाळी 6 वाजल्यापासून सुरु असलेलं धाडसत्र आजही सुरु आहे.
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ

