Ajit Pawar | कोकणी माणूस विचारपूर्वक मतदान करतो हा इतिहास : अजित पवार
कुठलिही संस्था चालवणारा प्रमुख कोण असतो, यावर तिचे यशापयश अवलंबून असते. शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवार डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले असताना बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार टोले हाणले.
सिंधुदुर्गः कोकणी माणूस विचारपूर्वक मतदान करतो हा इतिहास आहे असे विधान अजित पवार यांनी केले आहे. कुठलिही संस्था चालवणारा प्रमुख कोण असतो, यावर तिचे यशापयश अवलंबून असते. शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवार डीपीडीसी बैठकीसाठी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आले असताना बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जोरदार टोले हाणले.
काय म्हणाले पवार?
अजित पवार यांनी सुरुवातीला सर्वांना नवीन वर्षाच्या आणि नाताळच्या शुभेच्छा दिल्या. आपण डीपीडीसी आणि कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितले. शिवराम भाऊ जाधव यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सहकाराचे मोठे काम करून ठेवले आहे. त्यांच्याशिवाय या जिल्ह्याचा इतिहास लिहिताच येणार नाही. हेच ध्यानात घेता यावेळी अजित पवारांनी शिवराम भाऊ जाधवांच्या कार्याला उजाळा दिला. ते म्हणाले, शिवराम भाऊंनी तळहाताच्या फोडासारखं बँकेला जपलं. कुठली संस्था चालवायची असेल, तर त्याचा प्रमुख कोण याला महत्त्व असतं. किंवा पाठिशी कोण राहणार याला ही महत्त्व असतं, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
Latest Videos
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....

