Ajit Pawar | मुख्यमंत्र्यांपुढे आमचं काही चालत नाही, अजित पवारांची मिश्किल प्रतिक्रिया

पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं होतं.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज पिंपरी चिंचवडला जाऊन राष्ट्रवादीला डिवचण्याचं काम केलं. पुणे जिल्ह्यात आपलं कोणी ऐकत नाही असं काही सांगतात. असं कसं? अजित पवारांना सांगू आमचं ऐका. नाही तर मुख्यमंत्री गेलेच आहेत आज दिल्लीला, असं जाहीर विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांपुढे आमचं काही चालत नाही, अशी मिश्किल प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.

दरम्यान राऊतांनी त्यांच्या विधानानंतर लगेच सारवासारव करण्यास सुरुवात केली होती. ते म्हणाले बघा चुकीचं ऐकू नका. माझं पूर्ण ऐका. चुकीचं लिहू नका. नाही तर लगेच ब्रेकिंग सुरू झालं असेल. मुख्यमंत्री दिल्लीचा अंदाज घ्यायला गेले आहेत. उद्या आपल्यालाही दिल्लीवर राज्य करायचं आहे. दिल्लीत कोणतं ऑफिस कुठे आहे, पंतप्रधान कुठे बसतात याचा अंदाज घ्यायला मुख्यमंत्री दिल्लीत गेले आहेत, अशी सारवासारवही त्यांनी केली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI