मिरवणारे बाजूला व्हा, काम करणारे पुढे या, फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजितदादांचे खडे बोल

बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.

मिरवणारे बाजूला व्हा, काम करणारे पुढे या, फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना अजितदादांचे खडे बोल
| Updated on: Aug 14, 2021 | 11:26 AM

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता संबंधितांना जागेवर खडसावणं ही अजित पवारांची पद्धत अनेकदा पहायला मिळालीय. आजही बारामतीत अजित पवारांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. काम करणारे पुढे या, मिरवणाऱ्यांनी बाजूला व्हा असं म्हणत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना टोला लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे आठवड्यातून एक दिवस बारामतीत येत असतात. या दरम्यान, विकासकामांची पाहणी, कोरोना आढावा बैठक असा त्यांचा दिनक्रम असतो. त्याचबरोबर कोरोना आणि नुकत्याच झालेल्या पूरग्रस्त मदत आणि साहित्याचं वाटप अजित पवार यांच्या हस्ते होत असतं. आजही विद्या प्रतिष्ठान संकुलाच्या परिसरात विविध संस्थांच्या वतीने आयोजित समाजोपयोगी उपक्रमांचा शुभारंभ अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी अजित पवार यांनी फोटोसाठी पुढे पुढे करणाऱ्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.

Follow us
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.