Nashik| ग्रंथदिंडी निघाली वाजत गाजत, भुजबळांच्या हाती विणा;

गीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली.

नाशिकः संगीताचे सूर, वाद्याच्या तालावर धरलेला ठेका, धुक्याची दुलई पांघरलेली नाशिकनगरी आणि हवेत बोचरा गारवा अशा वातारणात नाशिकच्या साहित्य संमेलनाला शुक्रवारी मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. सकाळी साडेआठच्या सुमारास ग्रंथदिंडीने कुसुमाग्रज निवासस्थान (टिळकवाडी) येथून प्रस्थान ठेवले. यावेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आमदार हिराण खोसकर यांनी हजेरी लावली. इतकेच नाही तर भुजळांनी हाती विणा धरला आणि उपस्थितांनी माना डोलावल्या.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI