आवडत्या शिक्षकाच्या बदलीने चिमुकल्यांचे डोळे पाणावले; पालकांसह ठिय्या, शाळेत न जाण्याचा इशारा
अकोल्यातील कुंभारी येथील जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक संतोष पाचपोर यांच्या बदलीमुळे विद्यार्थी व पालक नाराज झाले आहेत. बदली रद्द न केल्यास शाळेत येणार नाही, अशी भूमिका घेत संतप्त विद्यार्थी व पालकांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
अकोल्याच्या कुंभारीमधील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या बदलीमुळे विद्यार्थी आणि पालक मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. आपल्या आवडत्या शिक्षकाची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यांनी स्पष्ट केले आहे की, जर शिक्षकाची बदली रद्द झाली नाही तर आम्ही शाळेत येणार नाही आणि मुलांचे दाखले काढून घेऊ. या प्रकरणात संतोष पाचपोर सर यांची बदली झाली आहे.
पाचपोर सर गेल्या सुमारे पंधरा-वीस दिवसांपासून शाळेत नाहीत. शाळेत विचारणा केली असता, ते ट्रेनिंगवर गेले असल्याचे सांगितले जाते. मात्र या काळात मुलांचा अभ्यास कोणीच घेत नाहीये, त्यांना शिकवले जात नाहीये, त्यामुळे मुले घरीच बसून आहेत. कोण्याही शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारणा केलेली नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांनी तातडीने शिक्षकाची बदली रद्द करण्याची मागणी केली आहे.
Published on: Aug 19, 2026 06:10 PM
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..

