धक्कादायक! देशातील सर्व ब्रँड्सच्या मीठ-साखरेत मायक्रोप्लास्टिक्स; रिसर्चमध्ये दावा
नुकत्याच एका अभ्यासात देशातील सर्व ब्रँड्सच्या साखर आणि मीठाची चाचणी करण्यात आली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. या सर्व ब्रँड्सच्या मीठ आणि साखरेत मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत.
आपल्या दैनंदिन आहारातील अत्यंत महत्त्वाचे घटक मीठ आणि साखर हेच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरल्याचं समोर येत आहेत. नुकत्याच एका अभ्यासात मीठ आणि साखरेबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, भारतातील जवळपास सर्व ब्रँडच्या साखर आणि मीठांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहेत. ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेनं केलेल्या या महत्त्वपूर्ण अभ्यासात भारतातील प्रत्येक ब्रँडच्या मीठ आणि साखरेची चाचणी करण्यात आली. या प्रत्येक ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्स असल्याची चिंताजनक बाब उघड झाली आहे. या संशोधनात मीठाचे दहा विविध प्रकार तपासले गेले. या संशोधनातून कोणकोणत्या गोष्टी समोर आल्या, मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय, त्यापासून आरोग्याला कोणता धोका आहे, याविषयी सविस्तर माहिती व्हिडीओतून जाणून घेऊयात..
Latest Videos
Latest News