'लोकशाहीचं वस्त्रहरण, EVM मध्ये घोटाळा?', 'या' मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण

‘लोकशाहीचं वस्त्रहरण, EVM मध्ये घोटाळा?’, ‘या’ मुद्यावरून बाबा आढाव यांचं आत्मक्लेष उपोषण

| Updated on: Nov 30, 2024 | 4:52 PM

डॉक्टर बाबा आढाव यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस असून त्यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून पाठिंबा दिला जात आहे. देशात संविधान आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करण्यासाठी बाबा आढाव यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं

जेष्ठ कामगार नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव यांच्या आत्मक्लेष उपोषणाचा तिसरा दिवस आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप बाबा आढाव यांनी आरोप केला. दरम्यान, शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनी बाबा आढाव यांची भेट घेतली. लोकशाहीची मूल्य उद्ध्वस्त होत असल्याचं म्हणत बाबा आढाव यांनी गुरुवारी आत्मक्लेष आंदोलन सुरु केलं आहे. आज त्यांच्या आंदोलनाचा हा तिसरा दिवस असून त्यांच्या या आंदोलनाला विरोधी पक्षाकडून पाठिंबा दिला जात आहे. देशात संविधान आणि लोकशाहीची सुरू असलेली थट्टा याचा निषेध करण्यासाठी बाबा आढाव यांनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटप करणारी योजना जाहीर करणे म्हणजे भ्रष्टाचाराला अधिकृत करणे असं असल्याचे आढाव म्हणाले. पैसे वाटप करणाऱ्या योजनेवर निवडणूक आयोगाने कसलाही आक्षेप न घेणे हे अनाकलनीय असल्याचेही त्यांनी म्हटले. विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण झाल्याचा आरोपही आढाव यांनी केला. तर ईव्हीएम आणि पैशाच्या वापरामुळे राज्यात वेगळा निकाल असाही त्यांनी आरोप केलाय. दरम्यान, बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे १९७० च्या दशकात नगरसेवक असून ते समाजवादी पक्षाचे सदस्य होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून आता त्यांची ओळख आहे.

Published on: Nov 30, 2024 04:51 PM