Video : श्वानपथकातील मिशकाचा मृत्यू, अहमदनगरमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकातील श्वान मिशका याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन सलामी देण्यात आली. तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. 1 ऑगस्ट 2016 रोजी नगर पोलिस दलातील श्वानपथकात हजर होऊन त्याने गुन्हेशोध कामकाजाला सुरुवात केली. अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात मिशकाने महत्त्वाची […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

Jun 02, 2022 | 4:34 PM

अहमदनगर जिल्हा पोलीस दलाच्या श्वानपथकातील श्वान मिशका याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शासकीय इतमामात त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आले. यावेळी पोलिस दलाच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करुन सलामी देण्यात आली. तर अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. 1 ऑगस्ट 2016 रोजी नगर पोलिस दलातील श्वानपथकात हजर होऊन त्याने गुन्हेशोध कामकाजाला सुरुवात केली. अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात मिशकाने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.श्वान मिशका हा नगर पोलिस दलातील श्वानपथकामध्ये 23 मे 2015 रोजी दाखल झाला होता. अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपींचा शोध घेण्यात श्वान मिशकाने मोठी कामगिरी बजावली. 19 ऑक्टोबर 2015 ते 31 जुलै 2016 या कालावधीत त्याने प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर येथे गुन्हेशोधक प्रशिक्षण पूर्ण केले.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें